Monday, September 7, 2026
spot_img
spot_img
spot_img

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये 14 विषयात प्रशिक्षण

गोंदिया, दि.16 : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत “किमान कौशल्य विकास कार्यक्रम” (DPC) या जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती यांनी जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रम (DPC) 2025-26 आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. सदर आराखड्यामध्ये अॅग्रीकल्चर, ऑटोमोटिव्ह, कन्सट्रक्शन, आयटी, ईलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड हार्डवेअर, टेलिकॉम, अॅपॅरल, ब्यूटी ॲन्ड वेलनेस, ग्रीन जॉब्स, मिडिया ॲन्ड एन्टरटेनमेंट, मॅनेजमेंट ॲन्ड एन्टरप्रेनोरशिप अॅन्ड प्रोफेशनल स्कील, हेल्थकेअर, स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस तसेच वॉटर मॅनेजमेंट ॲन्ड प्लम्बींग अशा एकुण 14 सेक्टरमध्ये प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. तरी गोंदिया जिल्ह्यातील स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी असलेल्या इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी तसेच नव्याने स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या प्रशिक्षण संस्थांनी नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची ईमारत, दुसरा माळा, रुम नं.210, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा 07182-299150 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular