Sunday, May 31, 2026

मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करावे

गोंदिया : इतर मागास वर्ग, विशेष जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागास सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासुन हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. शासन धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना वेळेवर व विहीत कालावधीमध्ये योजनांचा लाभ मिळावा याकरीता मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज शैक्षणिक सत्र 2025-26 पासुन महाडीबीटी प्रणालीव्दारे दि.18 ऑगष्ट 2025 पासून स्विकारण्यास सुरुवात झालेली आहे.
तरी जिल्हयातील सर्व शाळेच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी प्रणालीवर खालील नमुद योजनांचे अर्ज नोंदणीकृत करुन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया या कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 5 वी ते 7 वी पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 8 वी ते 10 वी इयत्तेतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. आठवी ते दहावीत शिकणान्या VJNT आणि SBC मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या VJNT, SBC विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती (ZP), माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या VJNT, SBC विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती (Only Mumbai), पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या व्हीजेएनटी आणि एसबीसी मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. ट्यूशन फी आणि परीक्षा फी भरणे (VJNT/SBC), सैनिकी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता.  महाराष्ट्र शासनाच्या https://prematric.mahait.org/Login/Login या संकेतस्थळावर शाळेच्या प्रोफाईलमध्ये प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांचे नावे युडायस व सरल प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिलेली आहेत. संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपलब्ध नावांमधुन योजनानिहाय विद्यार्थ्यांची तपासणी करुन अर्ज पडताळणी करुन कार्यालयास ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दि.30 सप्टेबर 2025 पर्यंत कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, तसेच वरील नमुद योजनांव्यतिरीक्त उर्वरीत योजनांचे अर्ज मागील सत्राप्रमाणे ऑफलाईन सादर करावे. असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गोंदिया यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular