Tuesday, May 26, 2026

नवरात्र विशेष महिला सक्षमीकरणासाठी कर्ज वितरण मेळावा

गोंदिया : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (MSRLM) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, गोंदिया यांच्या वतीने नवरात्र विशेष महिला सक्षमीकरण कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम कामठा, पांजरा व बिरसोला प्रभाग क्षेत्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक रावणवाडी शाखेत पार पडला.
या मेळाव्यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली 84 स्वयंसहायता समुहांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले. एकूण रु. 2 कोटी 51 लाख कर्जाची मंजुरी देऊन महिलांना कर्जमंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले, बँक शाखा व्यवस्थापक दीपिका शहारे, जिल्हा व्यवस्थापक प्रशांत बीलवणे व नागेश कटरे, तालुका अभियान व्यवस्थापक जितेंद्र बिसेन यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या अर्थसहाय्यामुळे स्वयंसहायता समुहांच्या महिलांना व्यवसाय वृद्धी, स्वावलंबन व आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळणार असून “आत्मनिर्भर महिला–आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला बळ मिळणार आहे. मेळाव्याला उपस्थित गट व बँकेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापकांनी महिलांना कर्ज वेळेत फेडण्याचे आवाहन करून, आर्थिक बळकटीकरण ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular