Thursday, April 30, 2026

कफ सिरपमध्ये विषारी पदार्थ आढळल्यामुळे वापर थांबवावा

गोंदिया, दि.7 : मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे.
कोल्ड्रिफ सिरप, समूह क्रःएस आर 13 (Coldrif Syrup, Batch No. SR-13) निर्मिती दिनांक मे 2025, कालबाह्यता दिनांक एप्रिल 2027, हे औषध मे. सेसन फार्मा, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू (Sresan Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu) यांच्याद्वारे उत्पादित केलेले असून त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol- DEG) हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वसामान्य जनता यांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे. किंवा खालील माध्यमांतून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी टोल फ्री क्रमांक- 1800222365, ई-मेल: jchq.fda-mah@nic.in, मोबाईल: 9892832289 संपर्क साधावा. सदर औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरिता अन्न व औषध प्रशासन येथील अधिकारी तामिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहे. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा अश्या सूचना सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करित आहे. गोंदिया जिल्ह्यातही अशा प्रकारचा साठा सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, जनतेने सावधानता बाळगावी आणि धोका टाळावा असे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular