गोंदिया, दि.7 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने बुधवार, दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, गोंदिया, सडक अर्जुनी व आमगाव या 3 ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन करण्यात आले आहे.
प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक नियोक्ता/प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार आहेत. ईच्छुक उमेदवारांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दुरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० यावर किंवा gondiyarojgar@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा. या प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये जास्तीत जास्त उमेदवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया रा.ना. माटे यांनी केले आहे.





