Wednesday, January 21, 2026
spot_img

20 डिसेंबरला होणाऱ्या न. प. निवडणूकीत 18,089 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

गोंदिया, दि.17 : न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया नगरपरिषदेच्या जागेकरीता प्रभाग क्रमांक 3 (ब), 11 (ब) व 16 (अ) आणि तिरोडा नगरपरिषदेच्या जागेकरीता प्रभाग क्रमांक 10 (अ) मध्ये येत्या 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. गोंदिया नगर परिषदेतील उर्वरित तीन वार्डामध्ये पुरुष-7652, महिला-8131 व इतर- निरंक असे 15 हजार 783 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार. तर तिरोडा नगर परिषदेतील एका वार्डामध्ये पुरुष- 1097, महिला- 1209 व इतर-निरंक असे 2 हजार 306 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील उर्वरित चारही प्रभागातील असे एकूण 18 हजार 89 मतदार शनिवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत आहे. सर्व एकत्रित मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता या निवडणूकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular