Thursday, April 30, 2026

मुरपार/लें येथील शाळेने पटकाविले कोसमतोंडी केंद्राचे प्राविण्य पद

सडक अर्जुनी, (गोंदिया) : तालुक्यातील कोसमतोंडी केंद्राचे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जि.प. वरीष्ठ प्राथमिक शाळा धानोरी येथे घेण्यात आले. या केंद्रांतर्गत प्राथमिक गटाचे प्राविण्य पद मुरपार/लें येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकाविले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सर्वाधिक पदे पटकाविले. कोसमतोंडी केंद्रांतर्गत अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात प्राथमिक गटातून मुले खो-खो प्रथम, मुली खो-खो प्रथम, कबड्डी मुले द्वितीय क्रमांक पटकावित प्राथमिक गटातून क्रिडा प्राविण्य प्राप्त करून आपल्या शाळेचा व गावाचा मान वाढविलेला आहे. याबद्दल मुरपार गावचे सरपंच कुंदाताई काशिवार तथा सर्व ग्रा.प. पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश पंधरे व सर्व समिती पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. चौधरी, सहायक शिक्षक वाय.डी. भानारकर आणि गावकरी यांनी भरभरून कौतुक करत तालुका स्तरावर खेळण्याकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular