Monday, May 25, 2026

ओबीसींचा रकाना नसल्यास जनगणनेवर बहिष्कार; १४ मे पासून गोंदिया तालुक्यात मोहीम

गोंदिया : देशात होणाऱ्या आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, अन्यथा ओबीसी समाज जनगणनेवर बहिष्कार टाकेल, असा इशारा सकल ओबीसी संघटना गोंदिया यांच्या वतीने आयोजित बैठकीत देण्यात आला.
गोंदिया येथील विश्रामगृहात आज आयोजित गोंदिया तालुकास्तरीय बैठकीत ओबीसी समाजाच्या संवैधानिक हक्कांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक परिस्थिती समोर आणण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. बैठकीदरम्यान समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी गोंदिया तालुक्यातील गावोगावी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच “ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, अन्यथा जनगणनेवर बहिष्कार” हा संदेश नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंचापर्यंत व प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याकरीता १४ मे पासून तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व ओबीसींना पक्षीय राजकारण बाजुला सारुन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत यांची होती उपस्थिती…
यावेळी विविध बबलू कटरे, डॉ प्रकाश धोटे, डाॅ. प्रशांत कटरे, राजीव ठकरेले, मनोज मेंढे, खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे , गौरव बिसेन, प्रमोद गुडधे, सुनिल भोगांडे, पप्पू पटले,  रवी भांडारकर, श्री हेमणे, श्री मतेे, श्री भांडारकर, प्रा. संजीव रहांगडाले, शिशिर कटरे, मोहसिन खान, एस यु वंजारी, धनलाल ठाकरेसह ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकजूट राहण्याचा निर्धार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular