Friday, May 1, 2026

बुद्धिस्ट युवक- युवती परिचय संमेलन 14 रोजी

गोंदिया : स्थानिक मरारटोली येथिल संथागार येथे विवाह इच्छुक बुद्धिस्ट युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. संथागार मॅरेज ब्युरोच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित आहे. आयोजकांनी प्रसिद्धीला दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात भावी उपवर-वधू यांच्यासह त्यांच्या आईवडिलांनी उपस्थित राहावे, अविवाहीत, विधुर, परीत्याक्ता यांनाही भाग घेता येईल. भावी वर वधू यांनी त्यांचा 4X6 आकाराचे पूर्ण छायाचित्र, यासह त्यांचे जीवन वृत्तांत आणि नोंदणी शुल्क जमा करून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन संतोष श्यामकुवर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular