Monday, September 21, 2026
spot_img
spot_img
spot_img

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत

गोंदिया, दि.21 : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकसंवाद उपक्रमांतर्गत मनोहर चौक गणेश उत्सव समिती, छोटी जे.एम. स्कूल, मनोहर चौक, गोंदिया येथे जनजागृती करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी एकत्र येणाऱ्या भाविक व नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रक्रिया आणि उपलब्ध माध्यमांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, या उद्देशाने लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचत असल्याने शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत आहे. मनोहर चौक गणेश उत्सव समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular