Sunday, September 13, 2026
spot_img
spot_img
spot_img

शांती मार्च काढून सिख बांधवांनी साजरा केला विर बाल दिवस

देवरी, (गोंदिया) : गुरू गोविंदसिंग यांच्या साहिबजादांनी लहान वयातच मातृभूमी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे शौर्य हा आपल्या भारत देशाचा वारसा आहे. त्यांच्या स्मरणात २६ डिसेंबर रोजी देवरी येथील सिख बांधवांनी शहरात शांती मार्च काढत गुरुगोविंद सिंग व त्यांचे साहेबजादे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत वीर बाल दिवस साजरा केला.
वीर बाल दिवसाच्या पित्यर्थ गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथून शांती मार्च काढण्यात आला. हा शांती मार्च गुरुद्वारापासून, पंचशील चौक, दुर्गा चौक, नॅशनल हायवे, राणी दुर्गावती चौक, चिचगड रोड ते गुरुनानक चौक दरम्यान काढण्यात आला. या शांती मार्चमध्ये सर्व शीख समाजातील स्त्री पुरुष, लहान मुले मुली पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये सहभागी झाले होते. गुरुनानक चौक येथे गुरू गोविंद सिंग,चार साहिबजादे, तसेच माता गुजरी यांच्या प्रतीमेसमोर मोमबत्ती जाळून व पुष्प अर्पण करून सर्व शीख बांधव व भगिनी यांनी अभिवादन केले. श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा देवरी व खालसा सेवा दल देवरी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या शांती मार्चमध्ये गुरुद्वारा गुरु सिंग सभा अध्यक्ष परमजितसिंग भाटिया, सचिव सात्विंदर सिंग भाटिया, कुलवंतसिंग भाटिया, प्रितमसिंग भाटिया, अनुपसिंग भाटिया,बंटी भाटिया, विजय भाटिया, डिंपल भाटिया, रिशी भाटिया,शैंकी भाटिया, इंदरजितसिंग भाटिया, बब्बु सलुजा, विंकल भाटिया,राजा भाटिया,तसेच शेकडो शीख बांधव व भागिनी सहभागी झाल्या होत्या. गुरुनानक चौक येथे अभिवादन केल्यानंतर गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथे गोंदियाचे रागी तनविरसींगजी व देवरीचे रागी कमलसिंगजी व अमरजितसींगजी यांनी आपल्या कीर्तनातून गुरू गोविंद सींगजी व त्यांच्या साहीबजादयांना स्मरण केले. यावेळी सर्व समाजबांधवांनी कीर्तनाचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular