Sunday, September 13, 2026
spot_img
spot_img
spot_img

स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे मंच : निशा काशिवार

कोसमतोंडी, (गोंदिया) : स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे मंच असून सर्वंच विद्यार्थी आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनाची मोठ्या आतूरतेने वाट बघत असतात, असे मत पंचायत समिती सदस्य निशा काशिवार यांनी व्यक्त केले.
त्या शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त संत बांगळुबाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोला संस्था द्वारा संचालित फुलीचंदजी भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोसमतोंडीच्या स्नेहसंमेलना निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या शाळेचे स्नेहसंमेलन फारच नियोजनबध्द असते‌. शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शाळेचे संस्थापक स्व. जगदीश येळे यांनी येथील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जे मार्गदर्शन केले व जी दीशा दाखविली त्या मार्गावर येथील कर्मवीर चालत आहेत, काम करीत आहेत हे बघून मनाला समाधान वाटत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधा रहांगडाले होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पो. पा. लता काळसर्पे, सरपंच भुमेश्वरी येळे मुंडीपार, सरपंच चेतना पटले धानोरी, वार्ताहर महेंद्रजी टेंभरे कोसमतोंडी, पो.पा.पुष्पा पटले धानोरी, ग्रां‌‌. प‌. सदस्य कुंदा मळकाम, शकुंतला काशिवार, मुख्याध्यापिका अभिलाषा रहांगडाले, सदाशिव कापगते चिचटोला, विकास कावळे, पो.पा. गेंदलाल टेंभरे, शिवकुमार काशिवार, प्राचार्य बी.बी. येळे, आनंद देशमुख, दुलीचंदजी मुंगमोडे मुरपार, डॉ. बिसेन, ब्रिजलाल ठवरे, सुशिल कांबळे मुरपार, शाळानायक मृणाली राऊत, उपनायक हार्दिक बावणकर इत्यादी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नंदीनी हिवसे यांनी केले तर आभार सा.शि.महेश बडोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular