Friday, April 17, 2026
spot_img

फुलचूर शेतशिवारात आढळला इसमाचा मृतदेह

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात परिचर म्हणून कार्यरत रविंद्र चुन्नीलाल कटरे याचे मृतदेह फुलचूर गावशिवारातील एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळले. ही घटना शनिवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुमारास उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. रविंद्र कटरे याचा अपघाती की घातपाताने मृत्यू? अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात परिचर म्हणून कार्यरत रविंद्र चुन्नीलाल कटरे हा मुळचा फुलचूर येथील रहिवासी आहे. शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी रविंद्र कटरे हा सायंकाळी ४ वाजता सुमारास घरून निघाला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यातच शनिवार देखील तो परतला नसल्याने कुटूंबियाकडून शोध घेणे सुरू झाले. तसेच फुलचूर शिवारातील किसान चौक परिसराला लागून असलेल्या शेतात ४ वाजता सुमारास त्याचे मृतदेह दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. परंतु, रविंद्र कटरे याचा आकस्मिक मृत्यू की घातपात करून त्याचा बळी घेण्यात आला? असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. पुढील तपास गोंदिया ग्रामीण करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular