Friday, June 5, 2026

दुचाकी अपघात; मुंडक वेगळे तर धड वेगळे, चिचगड रोडवरील सालई गावाजवळील घटना

गोंदिया : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड रोडवरील सालई गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भिषण झाला की ज्यात दुचाकी चालकाचा मुंडक वेगळे तर धड वेगळे झाले. निकेश आत्माराम कराडे (वय 32 वर्षे रा. मोहगाव(आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर मृत व्यक्ती हा MIDC देवरी येथे एका कारखान्यात कार्यरत होता. सोमवार, 6 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजताच्या सुमारास कामावरुन सुट्टी झाल्यावर आपल्या दुचाकी क्र. MH 35 AV 2968 ने गावाकडे परत जात होता. मात्र रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भिषण होता कि दुचाकी चालक निकेश कराडे या युवकाचे मुंडके वेगळे व धड वेगळे झालेले होते. सदर घटनेची माहिती परीसरातुन आवागमन करणाऱ्या नागरीकांनी देवरी पोलिसांना दिली. देवरी पोलिस घटना स्थळी दाखल होत पंचनामा करत मृत व्यक्तीला ताब्यात घेत शव विच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठवण्यात आले. सदर घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करत वाहन व वाहनचालकाचा शोध देवरी पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular