Wednesday, April 22, 2026

पुनर्वसित पिंडकेपार येथील प्रकल्पबाधितांना मिळणार हक्काचा भूखंड : खा. प्रफुल पटेल

१ जुलै ला ५८ बाधित कुटुंबांना प्लॉट वाटप होणार
भंडारा : जिल्ह्यातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार व पिंडकेपार (टोली), ता. भंडारा येथील प्रकल्पबाधित पात्र नागरिकांना अखेर हक्काचे भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोसे पुनर्वसन ३४ पूर्णता बाधित गावांपैकी पिंडकेपार टोली च्या पुनर्वसनाच्या प्रश्न मागील १५ वर्षापासून अनेक तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होता. अनेक अडचणी या प्रकरणात आल्या त्या मार्गी लावण्यासाठी सर्व तत्कालीन कलेक्टर यांनी प्रयत्न केला पण एक ना अनेक अडचणी मुळे १५ पंधरा वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे वाटप होऊ शकले नव्हते. मात्र खासदार प्रफुल पटेल यांनी सातत्याने हा विषय शासन दरबारी मांडून त्यांच्या पाठपुराव्याने एकूण ५८ प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना भूखंड वाटपाचा लाभ होणार आहे. भंडारा जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी गावठाण मौजा बेला येथे भूखंड वाटपास मान्यता दिल्याने दि. १ जुलै २०२५ रोजी प्रत्यक्ष भूखंड वाटपाची कार्यवाही पार पडणार आहे. हा निर्णय प्रकल्पग्रस्तांसाठी दिलासा देणारा असून १५ वर्षापासून पिंडकेपार टोली प्रकल्प बाधित कुटुंबाना न्याय मिळाला आहे. याबद्दल मौजा पिंडकेपार येथील नागरिकांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular