Friday, June 5, 2026

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली ११ रोजी 

गोंदिया : मरार समाज कल्याण समिती व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गोंदियाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोंदिया येथे शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. बाईक रॅलीची सुरूवात मरार समाज कल्याण समिती अध्यक्ष आत्माराम पाचे व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष अरविंद भावे हे झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. बाईक रॅलीची सुरुवात भीमनगर मैदानपासून संपूर्ण गोंदिया शहर ते मरारसमाज़ भवन, मरारटोली, बापूनगर गोंदिया येथे समापन करून मरारसमाज भवन गोंदिया येथे महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात येणार आहे. तरी सदर बाईक रॅली मध्ये बहुजन समाजातील पुरुष- महिला, तसेच सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मरार समाज व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गोंदियाच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular