Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

ज्येष्ठ पत्रकार नंदूप्रसाद शर्मा यांचे निधन

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. नंदूप्रसाद मनीराम शर्मा (वय ५४ वर्षे) यांचे गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने देवरी परिसरातील पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. श्री. शर्मा यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राने एक ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार गमावला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी देवरी येथील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular