Friday, June 5, 2026

लाचखोर तलाठी फरार तर दलाल एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : एका महिलेकडून शेत जमिनीच्या फेरफारासाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यात तडजोड करीत अडीच हजार रुपयांत मांडवली करत आपल्या दलाला मार्फत ती स्वीकारणं त्या तलाठ्याच्या अंगाशी आले. दलाल एसीबीच्या जाळ्यात फसला हे पाहून तो लाचखोर तलाठी फरार झाला आहे.
पारध (ता. भोकरदन) येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारध साजाचा ग्राम महसूल अधिकारी अर्थात राज्य शासनाच्या महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी अभय मधुकर कुलकर्णी यांने संबंधित महीलेकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्या तक्रारदार महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची पडताळणी करून सोमवार, २४ फेब्रुवारी २०२५ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपअधीक्षक बी.एम.जाधवर, पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, गणेश चेके, अशोक राऊत यांनी सकाळी पारध तलाठी कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, तडजोडी अंती ठरलेली लाच रक्कम २५०० रुपये स्विकारताना ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी याचा खासगी दलाल कृष्णा गणेश दळवी याच्या मार्फत स्विकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले असून दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular