Monday, April 20, 2026
spot_img

घरफोडीतील 3 आरोपींना 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा

मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया यांचा न्यायनिवाडा
गोंदिया : शहरातील पंचशील चौक, मातटोली येथील 62 वर्षीय तक्रारदार महिला फिर्यादी आपल्या पतीसोबत तीन दिवसांकरिता नागपुर येथे गेल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी संधीचा लाभ घेत घराच्या आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 2 लाख 10 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले. दरम्यान घरफोडी करणाऱ्या तिन्ही आरोपींना गोंदिया न्यायालयाचे मा. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 27 मे 2025 रोजी 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 3,000 रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अभिषेक उर्फ जादु प्रेमलाल वर्मा (वय १९ वर्ष, रा. श्रीनगर, गोंदिया), घनश्याम उर्फ गोलु अशोक चौधरी (वय १८ वर्ष, रा. श्रीनगर गोंदिया) आणि उदय उर्फ आऊ उमेश उपाध्याय (वय १९ वर्ष, रा. रेल्वे चौकी जवळ मुरी, गोंदिया) अशी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
सविस्तर असे की, तक्रारदार महिला फिर्यादी बेगम खुर्शीदा नाशिर शेख (वय ६२ वर्ष, रा. पंचशिल चौक माताटोली गोंदिया) यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार दिली की, फिर्यादी ही पतीसोबत नागपुर येथे गेली होती. या संधीचा लाभ घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरील मुख्य दरवाज्याला लावलेल्या कुलूप तोडुन आत प्रवेश केले. घरातील मधल्या रुम मधील आलमारीत मध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 2 लाख 10 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना दिनांक 29 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 चे 12 वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक ७०८/२०२३ कलम ४५४,४५७, ३८० भादंवि.चा दाखल करुन तपास करण्यात आला. वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीचा शोध घेवुन आरोपी अभिषेक उर्फ जादु प्रेमलाल वर्मा, घनश्याम उर्फ गोलु अशोक चौधरी आणि उदय उर्फ आऊ उमेश उपाध्याय सर्व रा. श्रीनगर गोंदिया यांना अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल एकुण 1 लाख 73 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासा दरम्यान आरोपीतांविरुध्द सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आरोपीतांविरुध्द दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे दाखल करुन फौजदारी *केस क्रमांक १७२/२०२४ प्रमाणे खटला चालविण्यात आला. मा. न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी अभिषेक उर्फ जादु प्रेमलाल वर्मा (वय १९ वर्ष, रा. श्रीनगर गोंदिया), घनश्याम उर्फ गोलु अशोक चौधरी (वय १८ वर्ष, रा. श्रीनगर गोंदिया) आणि उदय उर्फ आऊ उमेश उपाध्याय (वय १९ वर्ष, रा. रेल्वे चौकी जवळ मुरी, गोंदिया) यांचे विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने आज 27 मे 2025 रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया यांनी घरफोडी करणारे नमूद आरोपी यांना 5 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर शिक्षा झालेल्या गुन्हयाचा प्राथमिक तपास सपोनि सागर पाटील यांनी केला असून तदनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिनी बानकर यांनी केला आहे. सदर खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता प्रणिता जोशी कुलकर्णी तसेच सदर गुन्ह्याचे पैरवी कामकाज पो.हवा. ओमराज जामकाटे यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करणारे तसेच तपास कामात सहकार्य करणारे, न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे सर्वांचे पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक किशोर पर्वते यांनी अभिनंदन कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular