Monday, April 20, 2026
spot_img

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

गोंदिया : आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 27 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सतीश फुंडे (55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये सायंकाळच्या सुमारास शेतीचे काम करत असताना वातावरणात बदल होत, विजेच्या कडकडाटीसह वादळाला सुरुवात झाली. त्यातच त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याच्या मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच त्यांनी प्रशासनाला माहिती देत घटनास्थळावर एकच गर्दी केली. मृत शेतकरी सतीश फुंडे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular