Saturday, June 6, 2026

८०६ भक्तांनी केले गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

सिंधु फ्रेंड्स ग्रुपतर्फे इको-फ्रेंडली गणेश विसर्जन
गोंदिया : प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही सिंधु फ्रेंड्स ग्रुप गोंदिया तर्फे सिंधी स्कूलच्या मैदानात कृत्रिम तलाव (पाण्याची टाकी) तयार करून इको-फ्रेंडली गणेश विसर्जन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ८०६ भक्तांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

मागील वर्षी ६५० मूर्तींचे विसर्जन झाले होते, तर यंदा ही संख्या वाढून ८०६ पेक्षा जास्त झाली. या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ ठेवणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे. या प्रेरणेतून आता आसपासच्या जिल्ह्यांतही अशा प्रकारचे उपक्रम सुरू झाले आहेत. या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पोलिस अधीक्षक गोरेश भांभरे, शहर पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, नगर परिषद चेअधिकारी राजीव जाधव व सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष दरयानोमल आसवानी, राजकुमार नौतानी, किशन तोलानी, तानिया भागवानी, रोहित अग्रवाल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सिंधु फ्रेंड्स ग्रुपच्या कार्यकारिणीत अध्यक्ष विकास तोलानी, अमित थावरानी, नीरज रंगलानी, पवन संभावनी, विजू नौतानी, आकाश हेमराजनी, हेमंत गोपालानी, गिरीश बिल्दानी, दिलीप पंजवानी, अविनाश जयसिंघानी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी केले व आभार प्रदर्शन विकास तोलानी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular