Friday, May 1, 2026

सुकळी-गोठणगाव रस्त्याचे काम धोकादायक; अपघाताची शक्यता

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुकळी-गोठणगाव राज्यमार्गावर रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता दुरूस्ती करताना विभाग व संबधित कंत्राटदाराकडून प्रवासी सुरक्षेला घेवून कोणतेही उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे रस्ता बांधकाम करताना अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे अनियंत्रित काम होत असल्याने रस्त्यावरुन ये-जा करणार्‍यांना मोठा फटका बसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सुकळी-गोठणगाव रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सदर काम केले जात आहे. रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून प्रवासांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सुकळी फाटा ते खैरी गावापर्यंत रोड खोदून त्यावर फक्त काळी गिट्टी आणि भिसी टाकण्यात आली. यामुळे वाहन जाताच रस्त्यावर पांढरा धूर निघत आहे. धुरामुळे वाहन धारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर परिसरातील रहिवाश्यांनाही यांचा फटका बसत आहे. सतत उघडणारा धुरामुळे दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठ्या अडचणी येत असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. तर रस्ता दुरूस्ती करताना वाहन धारकांच्या सुरक्षेला घेवून कसलाही प्रकारची उपाययोजना करण्यात आला नाही. यामुळे सदर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम वाहन धारकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

कंत्राटदाराचे दुर्लक्ष; नागरिकांना धोका….
रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे.परंतु, सदर रस्ता परिसरातील महत्वपूर्ण रस्त्यांपैकी एक असल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत या रस्त्यावरून दुचाकी चालवणे अत्यंत धोकादायक झाले आहे. गिट्टी मोकळी असल्याने गाडी घसरत आहे. यामुळे सतत अपघात होण्याची शक्यता असते. याकडे दुरुस्तीचे काम करणार्‍या कंत्राटदाराकडून पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular