बाईक रॅली, कलश व गुढीधारी, लेझिम पथक, भजन दिंडी व सजीव कला देखावे ठरले मुख्य आकर्षण
गोरेगाव, (गोंदिया) : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा, वसंत ऋतूचा पहिला दिवस, प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्यामध्ये आगमन केले तो हा शुभ दिवस हिंदू नववर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. अनंत विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने गोंदिया जिल्हा स्वस्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळाच्या वतीने नगर पंचायत गोरेगाव येथे 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत भव्य दिव्य नववर्ष स्वागतयात्रा काढून हिंदू नववर्षाचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे संपूर्ण गोरेगाव येथे भक्तीचे नवचैतन्य उमटले असल्याची प्रचिती दिसून येत होती.

गोरेगाव येथील राधाकृष्ण मंदिर येथून सकाळी 7 वाजता जगद्गुरूश्रींची प्रतिमाचे विधिवत पूजन अर्चना करून रथावर शोभयात्रेसाठी स्वारी काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात डी जे, ढोल, तासा, टाळ, मृदंग यांच्या गाज्या वाज्यात होती. तदनंतर हिंदू धार्मियांना शुभेच्छा व जनजागृती फलक, युवक युवतीची बाईक रॅली, कलशधारी महिला, गुढी व झेंडेधारी भगिनी, लेझिम पथक, वानरसेना, प्रभू रामदरबार, सीताहरण कुटी, पारंपारिक व्यवसाय, नटखट मखणचोर कान्हा व गवळणी, गुढीपूजन, प्रभू शंकर* *पार्वती, संतश्री गजानन महाराज, नवदुर्गा, भारतमाता, भजनी मंडळ इत्यादी सजीव जिवंत देखावे मुख्य आकर्षनाचे केंद्र ठरले व शेवटी जगद्गुरूश्रींची प्रतिमा स्वार रथ होता. एकणंदरीत नामगजर व जायघोषणे संपूर्ण गोरेगाव नगरी भक्तिमय वातावरणामुळे न्हाऊन गेली होती. 3 की.मी. अंतराच्या या पायी शोभायात्रेत विविध सामाजिक संघटनेकडून मार्गांवर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अल्पोपहारची व्यवस्था दिसून येत होती. वाहतूक व्यवस्था व आरोग्य चमू तसेच शिस्तबद्ध सोभायात्रा यासाठी हिंदू संग्राम सैनिक चे स्वयंसेवक काळजी घेत होते. या शोभयात्रेचा समारोप राधाकृष्ण मंदिर येथे दुपारी 12,वाजता करण्यात आला, जगद्गुरू यांची प्रतिमा संतपीठावर ठेऊन धुपारती करण्यात आली. तदनंतर जिल्हा सेवा समितीकडून प्रत्येक आठही तालुक्यातील सहभागी सुंदर देखावा सादर करणाऱ्या *कलाकारांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मुलचंद खांडवाये यांनी मांडले, संचालन जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम यांनी केले तर आभार जिल्हा सचिव जैपाल खांडवाये यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्वश्री वैशाली चतुर, प्रकाश भोंडे, ताराबाई राऊत, प्रकाश कोरे, नाईकताई, हेमलता गिरेपुंजे, संजय चन्ने, पंकज खांडवाये, शुभम दिघोरे, दामोदर शेंडे, रोशन कुर्वे, मुन्नीलाल नाईक, दिलीप ठाकूर, पार्थिव राऊत, राजेंद्र भांडारकर, शिवाजी बोहरे, धनेश गायकवाड, रवींद्र भांडारकर, डालिकराम वाघाडे, गेंदलाल येडे, गिरधारी जमाइवार आदींनी सहकार्य केले.



