Sunday, January 18, 2026
spot_img

हरहिलेले 12 महागडे मोबाईल मूळ मालकांना केले परत; रावणवाडी पोलिसांची कामगिरी

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकुण 12 महागडे मोबाईल पोलिसांनी शोधुन काढले. सदरचे मोबाईल आज 17 जून रोजी रावणवाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले.
रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे रावणवाडी पोलीस ठाणेचे ठाणेदार वैभव पवार यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी येथील पोलीस पथक यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करुन पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले 12 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीकशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदरचे मोबाईल आज 17 जून 2025 रोजी रावणवाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडी ठाणेचे चे पो.नि. वैभव पवार, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेल येरणे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular