Sunday, July 26, 2026

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बनगावला आकस्मिक भेट

गोंदिया : जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बनगावला 18 जुन रोजी बुधवारी दुपार वेळेत आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा,शासकिय निवास्थान ई.विविध बाबींचा आढावा घेवुन मुख्यालय राहणे,रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करणे,पावसाळ्यात साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. भेटि दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र बनगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रमा साठवणे, अँलोपँथीक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ताम्रध्वज नागपुरे, आरोग्य सहाय्यक प्रभाकर मुनेश्वर, आरोग्य सहायिका साखरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शृती लिल्हारे, स्टाफ नर्स सत्वशिला पारधी, आरोग्य सेविका गिता बिसेन, कनिष्ठ सहाय्यक फरकुंडे, संगणक परिचालक पोहरे यांचेसह ईतर कर्मचारी उपस्थित राहुन कामकाज करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular