Wednesday, January 21, 2026
spot_img

योग म्हणजे स्वतःला आतून पाहण्याचा आरसा : डॉ. धुमनखेडे

देवरी येथील गुड मार्निंग ग्रुपतर्फे योग दिन साजरा
देवरी, (गोंदिया) : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे स्वतः स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे तणावग्रस्त जीवनशैलीला जवळपास सर्वांनाच सामोरे जावे लागते. यातून अनेक व्याधी जन्म घेतात. जर स्वतःचे स्वास्थ्य निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येकाने योगाला आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकार करावा. किमान दरदिवसी एक तास वेळ काढून योग केल्याने आपले मन आणि तन दोन्ही सदृढ बनू शकतात. योग म्हणजे स्वतःला आतून तपासून पाहण्याचा आरसा आहे, असे प्रतिपादन देवरीचे सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. दीपक धुमनखेडे यांनी केले.
ते आज शनिवार (ता.२१) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी देवरीच्या गुड मार्निंग पथकाने आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी देवरीचे प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र अग्रवाल होते. यावेळी जितेंद्र वासनिक, ओंकार शाहू, कमलेश शाहू, देवचंद बहेकार, रविंद्र बंसोड, शर्मा डेअरीचे अनिल शर्मा, पत्रकार सुरेश भदाडे,विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. धुमनखेडे म्हणाले की, मुख्य म्हणजे योगाची जी मुद्रा आपण टाळतो, त्याच मुद्रेची आपणास नितांत आवश्यकता आहे. म्हणून दररोज केलेला अभ्यास हा त्यावर रामबाण उपाय आहे. यावेळी राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, योग म्हणजे फक्त आपल्या पाहण्याच केवळ दृष्टीकोन बदलत नाही तर पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बदलवून टाकतो. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरविंद तरोणे, प्रभू डोंगरे, मनोहर बडोले, रिजवान शेख, अरूण दखने, नितेश पेटकुले, अनमोल खोब्रागडे,रंजीत मेश्राम, मोसिन सय्यद, यावलकर आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular