नागपूर : जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम रत्नागिरी (महाराष्ट्र ) यांचा 5 व 6 ऑगस्ट ला नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका अंतर्गत कुही रोड नेरला ( वडोदा ) येथे समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्याचे आयोजन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान उपपीठ नागपूर च्या वतीने करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. विज्ञाणामुळे सर्व भौतिक सुखाचे साधन उपलब्ध झाले असले तरी मानसिक दृष्ट्या अंतःकरणातून हताश, निराश, मन:शांतीचा अभाव, आत्मिक सुखाचा अभाव जाणवत आहे. यासाठी सांप्रत काळात गुरुमार्गाने जावून आत्मउन्नती साधता येथे अशी शिकवण रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आपल्या प्रवचनातून देतात. उपस्थित भाविकात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून, संयम, समयसूचकता, नेतृत्व गुण, परिपक्वता, चिकाटी, दूरदृष्टीकोन अशा विविध गुणांनी माणूस विकाशित होतो हे पटवून देतात. आज घडीला रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे भक्त, साधक व शिष्य यांची संख्या कोट्यावधी ची असून डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेऊन आनंदी जीवनाचा मार्ग अनुसरण करीत आहेत.
“तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा”
या शिकवणीचे प्रत्यक्ष पालन करून आज राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर अपघातग्रस्थासाठी 53 ऍम्ब्युलन्स मोफत सेवा देत आहेत. सिकलसेल, थ्यालेसिमीया व कॅन्सर सारख्या रुग्णांसाठी दरवर्षी लक्षावधी रक्तदान करून रक्त कुपिका संकलित होत आहेत. मानवसेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे हे कृतीतून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी श्री संप्रदायकडून साकारत आहेत. याशिवाय वैदिक सनातन हिंदू धर्माची संस्कृती जोपासना व संवर्धन करून प्रत्येक समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यातुन उपासक दिक्षा, साधक दिक्षा देत असतात. मंगळवार, 5 ऑगस्ट ला 7 वर्षाच्या मुलापासून तर प्रोढा पर्यंत स्त्री पुरुषांना उपासक दिक्षा देण्यात येणार आहे. तर बुधवार, 6 ऑगस्टला साधक दिक्षा देण्यात येणार आहे. आजघडीला मानसिकरित्या खचलेल्या, व्यसनाधीन व्यक्तीला आणि हताश, निराश व्यक्तीच्या समस्या ऐकून त्यांना सुयोग्य व अचूक मार्गदर्शन देऊन रंजल्या गांजल्याना समाधान देत आनंदी जीवनाचा मार्ग देत आहेत. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रत्यक्ष दर्शन कार्यक्रमात लाभणार असल्यामुळे भाविकासह नागरिकांची गर्दी आजपासूनच नेरला (वडोदा )नागपूर येथे बघावयास मिळत आहे. कार्यक्रम स्थळी सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिवसभर महाप्रसाद व दर्शन सुविधा करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





