२०० औषधी वनस्पती व फळझाडांचे वृक्षारोपण : सम्राट अशोक विद्यालयात ‘एक पेड माॅ के नाम’
नवेगावबांध, (गोंदिया) : विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजून घेऊन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने त्याची खूप गरज आहे.भविष्यातील मानवाला प्राणवायूची भरपाई हे वृक्षारोपणातूनच होणार आहे. आज आपण विद्यालयात २०० वन औषधी व फळझाडे लावत आहोत. जंगलातील फळझाडे नष्ट झाल्यामुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव गावात वाढत आहे. त्यामुळे मानव व वन्य प्राणी हा संघर्ष रोखण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव रामबाण उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून यावेळी केले.
ते सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुनीमोरगाव व उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या सुभाषचंद्र बोस क्लबच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १८ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत,एक पेड माॅ के नाम या उपक्रमांतर्गत २०० औषधी वनस्पती व फळझाडांचे आज विद्यालयात वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.त्याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच युवराज तरोणे,पोलीस पाटील शंकर तरोणे,सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकारी तथा वनपरीक्षेत्राधिकारी कु.प्रियंका बनसोड, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला शिवनकर, तंमुस अध्यक्ष सरिता मेश्राम, विद्यालयाचे सचिव एल. आर. भैसारे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक लागवड अधिकारी संतोष घुगे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक एम. एस. चांदेवार, प्रादेशिक वन विभागाचे बाराभाटी बिटाचे वनरक्षक एम. बी. खोब्रागडे, लता टेंभुर्णीकर उपस्थित होते. वृक्ष लागवडीनंतर त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी झाडे दत्तक घ्यावी व त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन करावे.भावी आयुष्यात ह्या स्मृती आनंददायी ठरणार आहेत. भविष्यात औषधी वनस्पती व फळांची झाडे मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे यांनी केले आहे. फराळ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून संचालन हरित सेना विभाग प्रमुख एस.व्ही.बडोले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एच.एस. पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक जे.एस.हटवार, एम.यु.घरोटे, गौरव चव्हाण, बी.आर.पंचलवार, राकेश वालदे यांनी सहकार्य केले. वृक्षारोपणा प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





