गोंदिया : जिल्ह्यात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा साजरा केला जात आहे. या कालावधीत नेत्रदानाबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्याचा उद्देश आहे. आणि विविध जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन 28 ऑगस्ट रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवाड्याच्या निमित्ताने पथनाट्याच्या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी या वेळी कॉर्नियल अंधत्वावर उपचार करण्यासाठी खराब झालेले कॉर्निया दान केलेल्या कॉर्नियाने बदलले जाऊ शकते.व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत कॉर्निया काढून टाकावा.एक दाता दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान करू शकत असल्याची माहीती या प्रसंगी दिली. जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे.मृत्यूनंतर आपले हे शरीर नष्ट होऊ शकते पण आपल्या माध्यमातून मृत्यूनंतर पण जर पाहण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे (eye donation) नेत्रदान असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी यावेळी म्हटले. सदर पथनाट्य दरम्यान नेत्र शल्यचिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी, डॉ.विजय कटरे, डॉ.राहुल तसेच नर्सिंग स्टाफमधील येळे सिस्टर आणि नर्सिंग विद्यार्थी उपस्थित होते. नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या जी.जी.येलम यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले.या नाट्यप्रयोगाद्वारे नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदान कोण करू शकतो व कोण करू शकत नाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी भाविका नागपुरे बघेले यांनी आभार प्रदर्शन केले.
केटीएस रुग्णालयात पथनाट्याद्वारे नेत्रदान जनजागृती
RELATED ARTICLES





