Wednesday, June 24, 2026

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार

गोंदिया : जिल्हा पोलिस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. दरम्यान त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात १ सप्टेंबर रोजी समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त झालेले पोलीस उप-निरीक्षक सुखदेव राऊत, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप मेश्राम, सहायक पोलीस उप-निरीक्षक उध्दव राऊत, पोहवा उमेश गायधने यांचा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थित त्यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्हे व भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आला. तद्नंतर सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांनी त्यांच्या कारर्गिद काळात पोलीस विभागात सेवा दिल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता पोहवा लियोनार्ड मार्टीन व राज वैद्य यांनी अथक परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular