Thursday, April 30, 2026

लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

गोंदिया : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जन्मदिवसानिमित्ताने गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय दक्षता आयोग महाराष्ट्र शासन व मा. महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सदर कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेली आहे. सदर दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्ट्राचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने भ्रष्टाचारी विरोधी जनजागृती संदर्भातील फ्लेक्स बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच गोंदिया शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयाच्या आवारात दर्शनी भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संदर्भातील भित्तीपत्रके व बॅनर्स लावण्यात येणार आहेत.
नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संदर्भातील पत्रके वाटून त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गोंदिया शहरातील मध्यवर्ती बस स्थानक तसेच गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुके येथील कार्यालय बस स्टॅन्ड सार्वजनिक ठिकाणी येथे जनजागृती संदर्भातील भीतीपत्रके लावण्यात येणार आहे. प्रसार माध्यमाद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे. असे बोर्ड लावणे आवश्यक असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर टोल फ्री नंबर लिहिणे आवश्यक आहे, अशा सूचना शासकीय कार्यालयांना दिले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कामात जनतेला सहभागी करण्याकरिता त्यांच्याकडे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांना प्रत्यक्ष खालील पत्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular