Thursday, April 30, 2026

“हर दिल को चाहिए होप – आता आसोलीत हृदय रुग्णांसाठी मोठा दिलासा!”

हृदयाची काळजी आता प्रत्येकाच्या आवाक्यात, होप हार्ट हॉस्पिटल द्वारे धर्मार्थ हृदय ओ.पी.डी. सेवेचा शुभारंभ आज
गोंदिया : ग्रामीण भारतात वैद्यकीय सुविधांची कमतरता ही नवीन गोष्ट नाही. पण एखादी संस्था सेवा म्हणजेच धर्म मानून काम करत असेल, तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकतं. गोंदिया जिल्ह्यातील आसोली गावात आता प्रत्येक हृदय निश्चिंतपणे धडकेल – कारण येथे सुरू होणार आहे एक आगळीवेगळी आणि अत्यंत आवश्यक अशी पुढाकार: “धर्मार्थ हृदय ओ.पी.डी.” ज्यामध्ये फक्त १० रुपये मध्ये आधुनिक हृदय तपासणी व सल्ला दिला जाईल.
होप हार्ट हॉस्पिटल, गेली तीन वर्षे उत्कृष्ट आणि समर्पित हृदय उपचारासाठी ओळखलं जातं. आता आपल्या सेवेला एक नवीन दिशा देत २७ एप्रिल २०२५, रविवारपासून दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ही ओ.पी.डी. सेवा आयोजित करणार आहे. ही सेवा डॉ. अनिरुद्ध गायधने यांच्या निवासस्थानी, ग्राम आसोली येथे होईल. या महान सेवेचा शुभारंभ आमदार विनोद अग्रवाल आणि डॉ. अनिरुद्ध गायधने (संस्थाध्यक्ष)यांच्या हस्ते होणार आहे. सेवा भावनेने प्रेरित, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, होप हार्ट हॉस्पिटलचा हा उपक्रम केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर एक मानवी उदाहरण म्हणून सुद्धा लक्षवेधी ठरतो. संस्थेचे प्रेरणास्थान परम पूज्य संत खराटे महाराज यांच्या सेवा आणि त्यागाला समर्पित हा कार्यक्रम हजारो हृदयांना नवजीवन देणार आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये:
✅ फक्त १० रुपये मध्ये हार्ट स्पेशालिस्टचा सल्ला
✅ आधुनिक हार्ट तपासणी सुविधा
✅ दर महिन्याच्या चौथ्या रविवारी नियमित ओ.पी.डी.
✅ आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याची सुविधा
✅ हृदयविकार आणि हार्ट अटॅक उपचार
✅ सरकारी आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेअंतर्गत
✅ सुवर्णपदक विजेते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध

ग्रामीण भागासाठी ही सेवा जीवनदायिनी आणि आदर्श ठरेल…
ग्रामीण भागात हृदयविकारांची वेळेवर ओळख न झाल्यामुळे आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेक जीव अकाली जातात. अशा परिस्थितीत होप हार्ट हॉस्पिटलचा हा उपक्रम फक्त एक ओ.पी.डी. नाही, तर नव्याने आशा देणारा प्रयत्न आहे – जो प्रत्येक धडधडणाऱ्या हृदयाला नवीन दिशा देईल.

संस्थेचा संदेश…
“आमचं उद्दिष्ट फक्त उपचार देणं नाही, तर जनजागृती आणि सुलभ आरोग्यसेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं आहे.” होप हमेशां आपल्या सोबत आहे” — आता एक वचन नाही, तर एक विश्वास आहे.

संपर्क करा आणि लाभ घ्या –दर महिन्याच्या चौथ्या रविवारी! स्थान: डॉ. अनिरुद्ध गायधने यांचे निवासस्थान, ग्राम आसोली, जिल्हा गोंदिया वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १२:००. संपर्क: 07182-299202, 9823224886, 8275290926

एक विनंती…
गोंदिया जिल्ह्यासह आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा. ही केवळ वैद्यकीय शिबिर नाही, तर आपल्या आरोग्याचे आणि भविष्याचे रक्षण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular