Thursday, April 30, 2026

शिवनी, जवरी रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?; नागरिकांचा सवाल

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना गावात “नो एंट्री” : संतप्त गावाकऱ्यांची भूमिका
आमगाव, (गोंदिया) : आमगाव तालुक्यातील मुख्यालयापासून 3 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनी व जवरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक मृत्यूला समोर जात मार्गक्रमण करण्यास विवश असल्याचे समोर आहे. मागील वीस वर्षापासून या मार्गावरील बांधकाम दुरुस्ती झाले नसल्यामुळे संपूर्ण रस्ताच हा खड्ड्यात पडला आहे त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रम करतांनी नागरिकांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत जनप्रतिनिधी व यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

आमगाव हे तालुक्यातील मुख्यालय असल्यामुळे या ठिकाणी बाजारपेठ शिक्षण संस्था शासकीय कार्यालय असल्यामुळे ग्रामीण भागातून नागरिक दररोज नियमित मार्गक्रमण करून शहरात येत असतात. आमगाव शहराच्या मुख्य भागात येण्यासाठी ग्रामीण भागातील शिवनी व जवरी या तीन ते चार किलोमीटर अंतरावरील रस्तेच खड्यात पडले आहेत. या मार्गवरून चिळचाळबांध येथील क्रेसर , खदान परिसरातून क्षमते पेक्षा जड वाहतूक असल्यामुळे रस्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यात एक ते दोन फुटाचे खड्डे पडल्याने वाहतूक नियंत्रणाबाहेर पडत आहे.या मार्गवर शैक्षणिक व रोजगार करिता येणाऱ्या नागरिकांना अपघाताना समोर होऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.जड वाहने तर चालतात पण या मार्गावरून साधे सायकल चालवणे कठीण झाले असल्याचे चित्र आहे. या मार्गावरील जड वाहने प्रतिबंधित व्हावे यासाठी नागरिकांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन मागणी केली. मात्र जिल्हा प्रशासन कोणतीच दखल घेतली नाही. तर रस्ते दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी नियोजन व निधी देण्यास प्राथमिकता दिली नाही. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यांची खडसर वाटचाल सुरु आहे. मात्र जिल्हा प्रशासन तर लोकप्रतिनिधी यांची या भागाकडे अनास्था असल्याने रस्ते खड्यातच पडले आहेत.विशेष म्हणजे आमगाव किडंगिपार शिवनी व जवरी मार्ग मागील २० वर्षांपासून दुर्लक्षित आहे. जिल्हा प्रशासनाकडे नियोजन शून्य कार्याची पावती आहे. तर लोकप्रतिनिधी यांना या गावाकडे फक्त मतदान पुरते नजरा वळविले जाते तर निवडणुकीनंतर या गावाच्या समस्याकडे वक्र दृष्ठी करण्यात येते. त्यामुळे नागरिक नाईलाज असल्याने मृत्यूला ओलांडून या खडसर रस्तावरून मार्गक्रमण करण्यास विवश ठरले आहे. समस्याच्या निराकरणासाठी अनेकदा नागरिकांनी प्रशासनाला तर लोकप्रतिनिधी यांना निवेदने, विनंती करून सुद्धा या रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. अनेक नागरिक अपघाताना बळी पडून आपला जीव गमावावा लागला मात्र याबाबद प्रशासन व लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत आहेत. आता नागरिकांनी अश्या प्रशासनिक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना या गावांमध्ये “नो एंट्रीचा, फलक लावून पायबंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती बाबुलाल डोये, पोपटारावं मटाले, बबलू मटाले, ओमप्रकाश मटाले, सी.जी. पाऊलझगडे, कवळू मेंढे, गजानन भांडारकर, होसलाल रहांगडाले, विजय नागपुरे या नागरिकांनी दिली.

या क्षेत्रातील विकास निधी जातो कुठे?
तालुक्यातील चिळचाळ बांध, भजेपार, डोंगरगाव, खुर्शीपार, बासिपार या माईन्स परिसरातील ओद्योगिक नागरिक क्षेत्रातील राखीव विकास निधी या परिसरातील विकास कामाना देण्यात येत नाही. रस्त्याच्या खडसर प्रवास करताना नागरिक मृत्यूला समोर जातात. जड वाहने चालत असल्याने या मार्गावरील रसतेच खड्यात पडले आहेत. मात्र जिल्हा प्रशासन याकडे वक्रदृष्ठी असल्याचे दाखवीत आहे. ओद्योगिक नागरिक क्षेत्रातील विकास निधी राखून ठेवण्यात असून सुद्धा तो निधी या भागातील समस्याकडे वळविले जात नाही. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ अशी अवस्था आहे. या क्षेत्राचे राखीव निधी जातो कुठे? असा सवाल नागरिक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular