Saturday, April 18, 2026
spot_img

बैलपोळा उत्सव स्पर्धेला प्रतिसाद; सौंदड येथे पोळानिमित्त आयोजन

सरपंच हर्ष मोदी यांचा पुढाकार…
सडक अर्जुनी, (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत सौंदडने यंदाही शेतकर्‍यांचा पारंपरिक बैलपोळा उत्सव उत्साहात आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या पुढाकाराने हिरवाजी मंदिर परिसरात थाटामाटात पार पडला. बैलपोळा साजरा करण्यात आला. दरम्यान आयोजित स्पर्धेला शेतकरी व गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौंदड ग्राम पंचायतीत सलग तिसर्‍या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सरपंच हर्षकुमार मोदी यांनी पोळा सण आगळावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज, २२ ऑगस्ट रोजी पोळा सणानिमित्त हिरवाजी मंदिर परिसरात बैल पोळा भरविण्यात आला होता. यानिमित्त बैलपोळा उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गावातील तसेच परिसरातील शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग झाल्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप आले. शेतकर्‍यांचा सन्मान आणि त्यांच्या श्रमाला खरी दाद मिळावी, या हेतूने सरपंच हर्ष मोदी यांनी स्वनिधीतून सहा आकर्षक पारितोषिके जाहीर करून विजेत्यांना प्रदान केली. यामध्ये प्रथम पुरस्कार दुर्योधन येरणे (५१००), व्दितीय पुरस्कार यशवंत विठ्ठले (४१००), तृतीय पुरस्कार सावल इरले (३१००), चतुर्थ पुरस्कार धर्मराज शेंडे (२१००), पाचवा पुरस्कार डोमरू इरले (११००), मारूती डोये यांना विशेष पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

‘बैलपोळा हा शेतकर्‍यांचा खरा सण आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या परंपरेला प्रोत्साहन आणि श्रमाला मान मिळावा म्हणून हा उपक्रम मी दरवर्षी माझ्या स्वनिधीतून राबवतो. पुढील काळातही हा उत्सव आणखी मोठ्या प्रमाणावर व भव्यतेने साजरा करू, असे सौंदडचे सरपंच हर्षकुमार मोदी यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत सौंदडचा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरला आहे. सण, संस्कृती व शेतकर्‍यांचा सन्मान यांचा संगम घडवणारा हा उपक्रम म्हणजेच खर्‍या अर्थाने ‘श्रमाला मानाचा मुजरा’ ठरला. त्यामुळे या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular