Saturday, April 18, 2026
spot_img

पोलीस ठाणे परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी जिल्ह्यातून तडीपार

कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये दहशत
गोंदिया : आगामी हिंदू/ मुस्लिम बांधवांचे सण तसेच नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रामनगर पोलीस ठाणे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून 2 महिन्याकरिता तडीपार केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी 1 सप्टेंबर रोजी केली.
रामनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सचिन उर्फ सन्नी सतीश पारधी राहणार सूर्याटोला, रोड रामनगर गोंदिया व शादाब नवाब खान राहणार कन्हारटोली गोंदिया हे पोलीस स्टेशन परिसरात टोळीने गुन्हेगारी करीत होते. रामनगर पोलीस ठाण्यात यांचे विरुद्ध कट रचून दुखापत करणे, शासकीय लोकसेवकावर हमला करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे,अवैधरित्या शस्त्र बाळगून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलांच्या लैगिक छळवणूक करणे, असे गंभीर गुन्हे केले आहे. पुढे येणाऱ्या हिंदू/ मुस्लिम बांधवांचे सण तसेच पुढे येणारे नगरपरिषद निवडणूक यादरम्यान सर्वसाधारण जनसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण जीवितास व मालमत्ता धोका होऊ नये या पार्श्वभूमीवर यांना गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार होणे संबंधात पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे पोस्ट रामनगर यांनी कलम 55 म पो का प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सादर करण्यात आला होता. पोस्ट रामनगर परिसरात वरील टोळी ने गुन्हेगारी करणारे गुन्हेगार यांचे समाजात चालणारे गुन्हेगारी कृत्य गुन्हेगारीवर आळा बसावा याकरिता मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सा. यांनी इसम नामे- सचिन उर्फ सन्नी सतीश पारधी राहणार सूर्याटोला रोड रामनगर गोंदिया व शादाब नवाब खान राहणार कन्हारटोली गोंदिया यांना आदेश क्र. पोअगो/स्थागुशा/हद्दपार आदेश /२६४४/२०२५ दिनांक ०१/०९/२०२५ रोजी चे आदेशान्वये यांचे गुन्हेगारी कृतीवर दखल घेत दोन्ही गुन्हेगार यांना गोंदिया जिल्ह्यातून दोन महिन्याकरिता हद्दपारची कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमुळे पोलीस ठाणे रामनगर परिसरातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली असुन सदर कारवाईचे परिसरातील लोकांनी स्वागत कौतुक केले आहे.

कारवाई यांनी पार पाडली..
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर यांचे निर्देशाप्रमाणे स्था. गु. शा. गोंदिया चे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शखाली पोलीस ठाणे रामनगर पोलीस निरिक्षक श्री. प्रवीण बोरकुटे , स्थानिक गुन्हे शाखा गोदिया येथील प्रतिबंधक सेलचे म.पो. उप. नी. वनिता सायकर, अंमलदार पो.हवा. प्रकाश गायधने, छगन विठ्ठले, पो. ठाणे रामनगर येथील पोहवा राजेश भगत यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular