Tuesday, September 15, 2026
spot_img
spot_img
spot_img

डॉ. आंबेडकर वाचनालयातील पाच विद्यार्थ्यांची पोलीस पदावर निवड

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालययात अभ्यास करीत असलेल्या 4 विद्यार्थ्यांची पोलिस तर एकाची रेल्वे लोकोपायलट पदावर निवड झाली.
यात डॉ. आंबेडकर वाचनालयातील रोहीत टेंभुर्ने याची रेल्वे लोकोपायलट तर अजय मानकर याची भंडारा पोलीस आणि वैभव मेंढे व जयश ताराम याची वर्धा पोलीस तसेच चेतन राऊत याची नागपूर पोलीस पदावर निवड झाली आहे.या सर्वाचे आदर सत्कार गुरूवारी वाचनालयात करण्यात आले. निवड झालेल्या ह्या पाच गुणवंत विद्यार्थांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील अध्यक्ष एड.श्रावण ऊके, सचिव सत्येंद्र बोंबर्डे कोषाध्यक्ष यादवराव मेश्राम व संपूर्ण कार्यकारी मंडळ तसेच वाचनालयातील कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून वाचनालयातील विद्यार्थांनी पुढील यशस्वी वाटचालीकरीता ह्या पाच ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular