Wednesday, April 22, 2026

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेने’च्या चिन्हाचे अनावरण

नागपूर : शिवसेना प्रणित ‘महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना’ या वीज क्षेत्रातील नव्याने स्थापन झालेल्या कामगार संघटनेच्या अधिकृत चिन्हाचे अनावरण आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नागपूर येथे आयोजित मेळाव्यात हा अनावरणाचा सोहळा पार पडला. ज्यामुळे संघटनेच्या कार्याला आणि भविष्यातील वाटचालीस अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ, राज्यमंत्री ना. आशिष जैस्वाल, तसेच संघटनेचे मार्गदर्शक आमदार कृपाल तुमाने आणि आमदार मनीषा कायंदे यांचा समावेश होता. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किरण पांडव यांचीही विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेने’चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष योगेश विटनकर, कार्याध्यक्ष मनोज मेश्राम आणि प्रवीण पाठराबे, तसेच महासचिव डॉ. अविनाश आचार्य यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. त्यांच्यासोबत दिलीप आवळे, जीवन डहाट, आशिष इंगळे, श्रीरंग दहासहस्त्र यांच्यासह संघटनेचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या अनावरणामुळे ‘महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना’ आता अधिकृतपणे वीज कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या अनावरणामुळे संघटनेला भविष्यात वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular