Wednesday, April 22, 2026

राकाँपाने 101 झाडे लावून साजरा केला खा.सुप्रिया सुळेंचा वाढदिवस

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे गोंदिया जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते 101 झाडे लावून कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व हिरवड फाऊंडेशन, सोच सेवा संस्थेतर्फे 29 जून रविवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग सेवेची जाणीव ठेवून 101 मोठे पिंपळ, मोहफुल, जांभुळवृक्षांचे रोपण करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांना उज्वल भविष्य व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, रुपेश निंबार्ते, मनीष अग्रहरी, विक्की सहारे, विधानसभा अध्यक्ष शेखर चामट, खोमेंद्र कात्रे, युवा तालुकाध्यक्ष अभय रामटेके, ओबीसी जिल्हाध्यक्ष रूपेश मेंढे, शहर महिला अध्यक्षा वैशाली पारधी, माधवी चुटेलकर, बादल मेश्राम, विकास, विवेक गौतम, गुड्डू राणे, कमल लिल्हारे, सचिन बैंस, सोनू खान, राहुल ढोमणे, संजोग बनसोड, यश चौरसिया, जितू वघारे, प्रफुल जरोदे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular